- Get link
- X
- Other Apps
गटारीची व्यवस्था नसल्याने , शौचालयाचे दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची नागरिकाची तक्रार !
मौजे हतीद ता.सांगोला या गावातील सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक हे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असलेबाबत येथील नागरिकाने आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.
तसेच या पोर्टल वर केलेल्या तक्रारीचे निवारण करताना आपण ती तक्रार जाणून न घेता व तेथील समस्या विचारात न घेताच तक्रार निकाली कशी काय काढू शकता असा जाब देखील श्री . जनार्दन आबा घाडगे यांनी सरकार ला विचारला आहे. तक्रारदार यांच्या घरासमोरच सांडपाणी,गटार पाईप लाईन चा एक शोषखड्डा केलेला आहे हे काम करून कमीत कमी ७,८ महिने पूर्ण झाले आहे. तरी अजून हि त्या खड्यावरती व्यवस्थित रित्या झाकणे बसविली नाहीत .
त्या कामाच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाकड़े खड्डा जरा पुढे घ्या असे सांगितले असताना त्या कडे दुर्लक्ष केले आणि तेथेच केले . आता त्या खड्याचा व तेथील सांडपाण्याचा त्रास इतका होत आहे की , अक्षरशः त्या ठिकाणी वास्तव्य करणे हे तक्रारदार यांच्या कुटुंबाचे आरोग्यास धोकादायक ठरू लागले आहे . ग्रामपंचायतीस सांगितले असता ते सांगतात की सांडपाणी सोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही , मग या मपंचायतीकडे जर जागा उपलब्ध नसेल तर गावाचे सांडपाणी व घान गोरगरिबांच्या दारात,घरात सोडून देणे किंवा टाकणं हे ग्रामपंचायतीस कितपत योग्य वाटते . याबाबत आपण याठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन तेथील ठिकाणची पाहणी लवकरात लवकर करावी , तेथील सांडपाण्यामुळे घराचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई ग्रामपंचायतीने भरून द्यावी लागेल याची नोंद घ्यावी अश्या आशयाची पंचायत समिती यांच्याकडे ही लेखी तक्रार ही दिलेली आहे .
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment